भाजपा मधील माळी समाजाचे ओबीसी नेते खडसे समर्थक अनिल महाजन यांचा जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये जाहीर प्रवेश

भाजपा मधील माळी समाजाचे ओबीसी नेते खडसे समर्थक अनिल महाजन यांचा जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये जाहीर प्रवेश.
भाजपातील माळी समाजाचे ओबीसी नेते एकनाथ खडसे समर्थक श्री.अनिल महाजन यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकनाथराव (नाथा भाऊ) खडसे  यांच्यासोबत जाहीर प्रवेश झाला आहे.भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री ज्येष्ठ नेते उत्तर महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ एकनाथराव (नाथा भाऊ) खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षाध्यक्ष  शरदचंद्र पवार साहेब , प्रदेशाध्यक्ष जयंतराव  पाटील व राष्ट्रवादीचे अनेक नेते यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.त्यांच्यासोबत यांचे खंदे समर्थक व माळी समाजामध्ये ओबीसीचे राज्यभर कुशल संघटन करणारे नेते श्री.अनिल महाजन यांनीही भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकनाथ खडसे यांच्यासोबत प्रवेश केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब पुरोगामी विचारसरणीचा असल्यामुळे यांचे हात बळकट करण्यासाठी ओबीसी बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आज एकनाथ खडसे यांच्यासोबत महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष,ओबीसी जनक्रांती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन यांनी जाहीर प्रवेश केला आहे.भारतीय जनता पार्टी पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा व  भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य पदाचा राजीनामा काल रात्री भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकात दादा पाटील व योगेश टिळेकर यांना ईमेल द्वारे पाठवला आहे असे यावेळी अनिल महाजन यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय येथे प्रवेश समारंभ संपन्न झाला यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या यांच्या हस्ते अनिल महाजन यांना प्रवेश देण्यात आला .त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड ,माजी मंत्री अरुणभाई गुजराती, गुलाबराव देवकर माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार दिलीप वाघ, आमदार अनिल भाईदास पाटील असे अनेक दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते पक्ष प्रवेशावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

Rocking Number''

JOSH Foundation observes World Disability Day with Mithibai’s Kshitij and Inventia Healthcare

Dr.Nikhil Nasta , inspirations to millions talks to Celebrity Times on this Teachers day exclusively.